Monday , September 21 2026
Breaking News

माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांना आनंदवाडी कुस्ती स्पर्धेसाठी निमंत्रण

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे दरवर्षी प्रमाणे आनंदवाडी कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आला आहे.
तेरा व चौदा जानेवारीला राज्यस्तरीय गुणांवर आधारित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. हिंदवाडी येथील आखाड्यात स्पर्धा संपन्न होणार आहेत.
कुस्तीची आवड निर्माण व्हावी. तरुणवर्गाने खेळाकडे वळावे याच उद्देशाने गेली तेरा वर्षे सातत्याने या स्पर्धा आयोजित केल्या जातात. चंदगड तालुक्यातील पैलवान अधिकाधिक सहभाग घेतात त्या अनुषंगाने माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानी जाऊन निमंत्रण पत्रिका दिली आहे.
यावेळी अध्यक्ष मारुती घाडी, नवरत्न सिंह पनवार, वाय. पी. नाईक, पी. आर. गावडे, उदयकुमार देशपांडे, सागर भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *