उचगाव : बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगुंदी फाट्यानजिक असलेल्या गणेश दूध संकलन केंद्र व गणेश मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रोजेक्टर बसविणारे हे बेळगाव तालुक्यातील एकमेव केंद्र असल्याचा दावा या केंद्रप्रमुखांनी केला आहे. या सांडपाणी शुद्धीकरण यंत्रसामग्रीचा शुभारंभ नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या दूध संकलन केंद्रामध्ये दुधापासून अनेक प्रोडक्ट बनविले जातात. प्रोडक्ट बनविताना जे वेस्ट पाणी वाया जाते. त्या पाण्यावर पुन्हा प्रक्रिया करून त्या पाण्याचे शुद्धीकरण करून पुन्हा तेच पाणी वापरता येते. आजच्या घडीला पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. पाण्याच्या कमतरतेवर हा प्रोजेक्टर अतिशय प्रभावी उपयुक्त ठरल्याचे मनोगत या केंद्राचे मालक उमेश उर्फ प्रवीण मोतीराम देसाई, संचालिका अरुंधती किरण देसाई, किरण देसाई व मॅनेजर सुधाकर करटे यांनी “वार्ता”शी बोलताना व्यक्त केले आहे.
सदर वेस्ट पाणी शेती, बागायत, जनावरांसाठी व इतर सर्व कामासाठी या पाण्याचा वापर करता येतो. या दूध संकलन केंद्रामध्ये रोज हजारो लिटर पाणी लागते. अशा वेस्ट जाणाऱ्या पाण्याचा उपयोग शुद्धीकरण करून पुन्हा वापरात आणल्याने या दूध संकलन केंद्राला पाण्याची कमतरता इथून पुढे भासणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एका तासाला ३००० लिटर पाणी शुद्धीकरण करता येते. दूध केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येते, तसेच रोगराई पसरू शकते. मात्र या पाणी शुद्धीकरण केंद्रामुळे या सर्व गोष्टींपासून बचाव करता येतो. या पाणी शुद्धीकरण यंत्रणेचा शुभारंभ लेफ्टनंट जनरल दिलीप देसाई, उमेश उर्फ प्रवीण देसाई, किरण देसाई, अरुंधती देसाई व सुधाकर करटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. हा प्रोजेक्ट सध्या सुरळीत कार्यान्वित असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta