बेळगाव : काकती पोलीस ठाण्यांतर्गत न्यु वंटमुरी गावात एका महिलेसोबत झालेल्या अमानुष घटनेत पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्यात कसूर आणि जाणीवपूर्वक बेजबाबदारपणा दाखवल्याच्या आरोपावरून काकती पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांना आज सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात योग्य काम केले असते तर हे प्रकरण इतके मोठे झाले नसते, असे सांगत उच्च न्यायालयाने बीसी अधिकाऱ्याच्या कर्तव्यात हलगर्जीपणाचा अहवाल पोलिस खात्याकडे मागितला होता. जाणीवपूर्वक बेजबाबदारपणे वागणाऱ्या काकती पोलिस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांना या विभागाच्या कारभाराच्या पार्श्वभूमीवर निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta