
बेळगाव : मंगळवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी जिवोत्तम यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण आणि पुतण्या असून ते अविवाहित होते.
त्यांच्या निधनाची माहिती मिळताच जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे तसेच अध्यक्ष शिवराज पाटील, विजय बनसुर यांनी त्यांच्या कुटुंबियांना भेटून देहदानाबद्दल माहिती सांगितली. त्यांच्या होकारानंतर त्यांचा मृतदेह जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यासोबतच केएलई रोटरी स्किन बँकेला त्वचा दान करण्यात आली. डॉ. चिराग यांनी त्वचादानाची प्रक्रिया पूर्ण केली.
यावेळी जायंट्स आय फौंडेशनच्या वतीने कामत कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta