
बेळगाव : येथील दि. पायोनियर अर्बन को-ऑप. बँकेच्या दोन विद्यमान संचालकांचे संचालक पद रद्द करण्याचा आदेश सहकारी खात्याच्या निबंधकाकडून आला आहे. बँकेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होत असल्याने खळबळ माजली आहे.
याबाबतचे वृत्त असे की बँकेचे संचालक रवी अर्जुन दोडन्नावर आणि लक्ष्मी दत्ताजी कानूरकर हे संचालक मंडळाच्या तीन बैठकीना सलग गैरहजर राहिले. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी त्यांनी गैरवर्तन केले त्यामुळे त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत काही सभासदांनी मांडला त्याला सभागृहाने मंजुरी दिली. त्यानंतर हा ठराव संबंधित खात्याकडे पाठवण्यात आल्यानंतर खात्याने चौकशी करून व कागदपत्रे पडताळून पाहून त्या दोघा संचालकांचे संचालकपद रद्द केले असून त्यांना 5 वर्षांपर्यंत पायोनियर बँकेची निवडणूक लढवता येणार नाही असाही आदेश दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta