बेळगाव : बेळगावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि भाजप नेत्या सोनाली सरनोबत यांच्या नियती फाऊंडेशनतर्फे नर्सिंग कॉलेजची गुणवंत विद्यार्थिनी कांचन पाटील हिला दहा हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
डॉ. सोनाली सरनोबत, डॉ. समीर सरनोबत यांच्यासह कांचन हीचे पालक यावेळी उपस्थित होते.
कांचन ही डॉ. रवी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंग कोर्सच्या दुसऱ्या वर्षात शिकते. तिचे वडील गवंडी आणि आई गृहिणी आहे. मात्र त्यांची मुलगी गुणवंत असून तिला परिचारिका बनून मानवजातीची सेवा करायची आहे. यामुळेच डॉ. सोनाली सरनोबत यांनी तिच्या यशाची दखल घेऊन तिला सहकार्य केले आहे.
डॉ. सरनोबत यांनी नियती फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर असंख्य गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत केली असून त्यांचे कार्य समाजात कौतुकास्पद ठरत आहे.