
बेळगाव : शेतकरी, कष्टकरी, शोषित, वंचितांसाठी आपलं जीवन जगणारे,सुखाच्या जीवनाऐवजी संघर्षमय जीवन जगण्याच त्यांनी धन्यता मांडली. सीमावासियांची ढाल व सीमावासियांच्या प्रत्येक लढ्यात अग्रेसर राहणारे व सीमाप्रश्नासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे सीमालढ्याचे भीष्माचार्य, सीमातपस्वी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, शिक्षणतज्ञ, रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाई एन डी पाटील हे होत. संत तुकोबाराय म्हणतात “जे का रांजले, गांजले त्यासी म्हणी जो आपले, संत तोची जाणावा, देव तेथेच असावा.” या युक्तीप्रमाणे आयुष्यभर शोषित, वंचित दीनदयाळ, अन्यायग्रस्तांसाठी जीवन जगणारे संतपुरुष म्हणजे भाई डॉक्टर एन डी पाटील होय. त्यांचा आज दुतीय स्मृतिदिन आणि योगायोगाने त्यांनी या जगाचा निरोप घेताना १७ जानेवारी हाच दिवस निवडला, ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्रासाठी बेळगावमध्ये पहिला रक्त सांडलं, त्याच दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला व योगायोगाने आपण आज हुतात्मा दिन व भाई एन डी पाटील यांचा स्मृतिदिन गांभीर्याने पाळत आहोत. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे विचार माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कॉलेज रोडवरील कार्यालयात भाई एन डी पाटील यांचा द्वितीय स्मृतिदिन आयोजित करण्यात आला होता. युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी आणि प्रास्ताविक केले. भाई एन डी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार मनोहर किणेर यांनी केले. माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, माजी तालुका पंचायत सदस्य अप्पासाहेब कीर्तने, युवा नेते आर एम चौगुले, शेतकरी कामगार पक्षाचे सचिव विलास घाडी यांनी भाई एन डी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केला व आदरांजली वाहिली.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस रामचंद्र मोदगेकर, बी एस पाटील, बी डी मोहनगेकर, आप्पासाहेब कीर्तने, महादेव बिर्जे, एस आर पाटील, मेघो बिर्जे, मनोहर संताजी, अनिल पाटील, नारायण सांगावकर, आर एम चौगुले, विलास घाडी, निंगाप्पा मोरे, दीपक पावशे, संजय पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta