
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून क्रीडा शिक्षिका वेटलिफ्टर पूजा संताजी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
थोर स्वातंत्र्य सेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून ही साजरा करतो. ब्रिटिश सरकारशी सशस्त्र आणि शिस्तबद्ध सैन्य तयार करून ज्यांनी लढा दिला. तरुणाईला स्वातंत्र्य लढ्यात उतरवून जाज्वल्य देशभक्तीची बीजे ज्यांनी रोवली. ‘तुम्ह मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा या घोषणेने इंग्रज सरकारला ज्यांनी हादरवून टाकले.. असे क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व म्हणजे सुभाषबाबू., त्यांचा जीवन प्रवास, देशभक्ती यांचा परिचय प्रमुख पाहुण्या पूजा संताजी यांनी आपल्या भाषणात करून दिला.
शिक्षण संयोजिका निला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत व शिक्षकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक विभाग प्रमुख श्रुती बेळगावकर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta