बेळगाव : बॉडीबिल्डिंग स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2024 मध्ये आपल्या बेळगाव जिल्ह्यातील माजी राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू डॉ. अमित एस जडे यांचा शरीरसौष्ठव क्रीडा विषयात पीएचडी प्रबंध यशस्वीपणे मांडल्याबद्दल आणि विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाकडून 2021 मध्ये डॉक्टरेट पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार श्री. अभय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बेळगाव शरीरसौष्ठव क्षेत्रात पीएचडी पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय राष्ट्रीय बॉडीबिल्डर आहेत.
शारीरिक शिक्षण विभागातून पीएचडी पदवी मिळवणारे ते पहिले व्हीटीयू रिसर्च स्कॉलर मानले जातात.
बेळगाव शहरातील शरीरसौष्ठवपटू डॉ. अमित एस. जडे यांनी शरीरसौष्ठव या खेळात सर्वोच्च पात्रता प्राप्त केल्याबद्दल आमदार श्री. अभय पाटील आणि मिस्टर इंडिया सुनील एन आपटेकर, समाजसेवक अनिल आमरोळे यांनी त्यांचे कौतुक केले.