Monday , September 21 2026
Breaking News

संस्कृती मंडळातर्फे ध्वजारोहण आणि लेझीम प्रदर्शन संपन्न

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : प्रजासत्ताकदिन आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्ताने राजहंस गडावर विशेष सोहळा पार पडला टिळकवाडी येथील संस्कृती महिला मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला वर्गाने सादर केलेल्या लेझीम प्रदर्शनाने उपस्थित यांची मने जिंकली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिना तलाठी यांनी केले. प्रमुख पाहुण्या नीता कुलकर्णी यांचे स्वागत माधूरी तलाठी यांनी केले. त्यानंतर ध्वजारोहण व राष्ट्रगीत झाले. विनीत तलाठी यांच्याद्वारे शिवप्रतिज्ञा देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 52 फुटी पुतळ्याचे पूजन नीता कुलकर्णी आणि माधुरी तलाठी यांनी केले. अश्विनी सरनोबत यांनी रामदास स्वामींनी छत्रपतींना दिलेल्या पत्राचे वाचन केले. त्यानंतर समूहातील सदस्यांकडून लेझीमचा शानदार खेळ करण्यात आला. रमा भिडे यांनी आभार प्रदर्शन केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *