Friday , November 22 2024
Breaking News

गाजराचे दर पाडले; रयत संघटनेतर्फे जयकिसान भाजी मार्केटसमोर निदर्शने

Spread the love

 

बेळगाव : परराज्यातून गाजरे मागवून स्थानिक शेतकऱ्यांच्या गाजराचे दर पाडल्याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य रयत संघातर्फे बेळगावातील जयकिसान होलसेल भाजी मार्केटसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

दुष्काळामुळे स्थानिक शेतकरी आधीच होरपळत असताना, सरकारने आणि संबंधित सरकारी खात्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यात आता होलसेल दलाल, भाजी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरु असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केले आहे. नागपूर, बेंगळूर आणि अन्य बाहेरगावच्या व्यापाऱ्यांकडून गाजरे मागवून त्यांची कमी दरात विक्री करण्यात येत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेली गाजरे आता विक्रीच्या टप्प्यात आली असताना व्यापाऱ्यांना कमी दरात देण्यासाठी शेतकऱ्यांना भाग पाडले जात आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करून गाजरांना योग्य दर देण्याच्या मागणीसाठी रयत संघाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. जयकिशन भाजी मार्केटसमोर रस्त्यावर झोपून, अंगावर गाजरे ओतून घेत घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

यावेळी बोलताना रयत संघटनेचे नेते प्रकाश नाईक म्हणाले की, दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत सरकार गंभीर नाही. जिल्हा प्रशासन, कृषी खाते, बागायत खाते, एपीएमसी आदी सरकारी खाती आणि यंत्रणाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास पुढे येत नाहीत. आता जयकिसान भाजीमार्केटमधील व्यापाऱ्यांनी नागपूर, बेंगळूर आदी बाहेरगावाहून गाजरे मागवून स्थानिक गाजरे कमी दरात विकण्यास आम्हाला भाग पाडत आहेत. याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन छेडले आहे. सरकारने हस्तक्षेप करत हा प्रकार थांबवून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी जयकिसान भाजीमार्केटमधील गाळ्यांसमोर ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली. आंदोलनात शेतकरी नेते राजू मरवे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

About Belgaum Varta

Check Also

भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना

Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *