Tuesday , December 16 2025
Breaking News

भूमी संरक्षण योजना या आठवड्यापासून लागू होणार : महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा

Spread the love

 

बेळगाव : या आठवड्यात आम्ही राज्यात जमीन संरक्षण योजना राबवणार आहोत. सर्व 31 जिल्ह्यातील 31 तालुक्यांची निवड करून ही योजना लागू केली जाईल, असे महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी सांगितले.बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री कृष्णा बैरेगौडा म्हणाले की, या आठवड्यापासून राज्यातील सर्व 31 जिल्ह्यांमध्ये भूमी संरक्षण योजना लागू करण्यात येणार असून, एका जिल्ह्यात एक तालुका निवडला जाईल आणि तीन महिन्यात सर्व जुनी कागदपत्रे डिजिटल केली जातील. महिने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जुन्या नोंदी जीर्ण अवस्थेत आहेत. त्यांचे जतन आणि डिजिटलायझेशन करणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी लागणार निधी त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.गेल्या चार महिन्यांत तहसीलदार कार्यालयातील 95 टक्के प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. एसी ऑफिस कोर्टात 35 हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सरकारी सर्व्हेअरची 357 पदे भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कामाचा ताण कमी होऊन लोकांना जलद सेवा मिळेल, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला.सर्वेक्षण विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ड्रोनच्या सहाय्याने जमिनीचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे भूमापनाची कामे जलदगतीने व पारदर्शकपणे होणार असल्याचे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला आमदार राजू कागे, काँग्रेस नेते सलीम खतीब, महांतेश कडाडी, आयेशा सनदी, शकील मुल्ला, इरफान अत्तार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये विशेष ‘करिअर मार्गदर्शन’ सत्राचे आयोजन

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *