
बेळगाव : शहरातील आबा क्लब व हिंद क्लब यांच्यातर्फे आयोजित पहिल्या भव्य पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेला उद्या शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता प्रारंभ होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सदर सलग दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराज्य जलतरण स्पर्धेमध्ये सुमारे 350 जलतरणपटू भाग घेणार आहेत. त्यामध्ये बेळगावसह पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, पणजी गोवा तसेच बेंगलुरु, हुबळी, धारवाड, मंड्या, दावणगिरी येथील अनेक मातब्बर तसेच नामांकित राष्ट्रीय जलतरणपटूंचा समावेश असणार आहेत. स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्या सकाळी 11:30 वा. रीतसर उद्घाटन, तर रविवारी 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी स्पर्धेची सांगता होईल. स्विमिंग पूलच्या प्रांगणात फूड स्टॉलची देखील सोय करण्यात आलेली आहे, असे स्पर्धा संयोजक एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta