
बेळगाव : बसवाण गल्ली येथील गॅस दुर्घटनेने रविवार दि. ४ रोजी चौथा बळी घेतला. मागील रविवारी झालेल्या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले होते. या जखमींवर उपचार सुरू असताना यापूर्वी तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जखमी मधील एका विवाहितेचा रविवारी पहाटे जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा चारवर पोहोचला आहे. ललिता मोहन भट्ट (वय ४८) यांच्यावर जिल्हा उपचार सुरू होते. मात्र उपचाराचा उपयोग न होता रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. खडेबाजार पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. यापूर्वी कमलाक्षी भट (वय ७६) , हेमंत मोहन भट (वय २७) गोपालकृष्ण सीताराम भट ( वय ८४) या तिघांचा मृत्यू झाला होता. एकाच कुटुंबातील चौथ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta