Thursday , March 5 2026
Breaking News

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे : ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार

Spread the love

 

बेळगाव : मराठी साहित्यिकांनी परिघाबाहेर जाऊन पाहिल्यानेच मराठी साहित्यात वेगळेपण आहे. देशामध्ये महाराष्ट्र व बंगाल या दोन राज्यांनीच वैचारिक परंपरा जपत देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. मराठी भाषेला १२ व्या शतकापासूनचा इतिहास आहे. त्यामुळे भाषा टिकविण्यासाठी चिंता व्यर्थ असून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, हे रास्त आहे आणि तो हक्कही आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी केले.

येळ्ळूर येथे १९ ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि. ११) पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षपदावरून श्रीराम पवार बोलत होते. ते म्हणाले, आज देशात वेगाने बदल होत आहे. या बदलांमागे अर्थकारण आहे. पण, त्याचे प्रतिबंध मराठी साहित्यात दिसत नाही नाहीत. कोविडनंतर शेअर बाजारात गुंतवणूक वाढली. तशाच प्रकारे रोज विविध फसव्या योजना आल्या. त्यामध्ये अनेकजणांचे आयुष्य उद्वस्त झाले. पण त्यावर मराठीत लिखाण झाले नाही.

वैचारिक युद्धात विचारानेच लढले पाहिजे : उद्घाटक सूर्यकांत शानभाग
प्रत्येकाचे जीवन साहित्य वाचनानेच प्रगल्भ होते. स्वातंत्र्यपूर्व काळातही साहित्य लेखनानेच मोठी क्रांती झाली आहे. मात्र, सध्या विचारांची लढाई आहे. अशा स्थिती विचारांनेच लढले गेले पाहिजेत. यासाठी थोर पुरुषांच्या विचाराचे मोल मोठे आहे, असे मत येळ्ळूर संमेलनाचे उद्घाटक व हॉटेल उद्योजक सूर्यकांत शानभाग यांनी व्यक्त केले.
येळ्ळूर येथील शिवाजी विद्यालय आवारातील स्वातंत्र्य सैनिक व दिवंगत ज्येष्ठ पत्रकार बाबुराव ठाकूर संमेलन नगरीमध्ये १९ व्या संमेलनाचे दीपप्रज्वलन करुन सूर्यकांत शानभाग यांनी उद्घाटन केले.
येळ्ळूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, माजी महापौर सरिता पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. शाम पाटील, ब्रम्हलिंग सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पावले, माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी, बी. जी. पाटील, हनुमंत कुगजी, चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर, मल्लाप्पा कुंडेकर, कृष्णा बिजगरकर, कलाप्पा मेलगे, किरण दिंडे, ऍड. सागर खन्नुकर, सुजाता मायाण्णाचे, प्रा. सी. एम. गोरल, प्रकाश अष्टेकर, महेश जुवेकर, परशराम कणबरकर, प्रकाश मालुचे, कृष्णा बिजगरकर, प्रकाश पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सूर्यकांत शानभाग पुढे म्हणाले, डॉ. आंबेडकर अजूनही देशाला कळले नाहीत, त्यांचा शिका व संघटित व्हा हा विचार अजून जागवला पाहिजेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सध्या टीका होतेय हा प्रकार चुकीचा आहे. वैचारिक युद्धात सावरकरांचे विचारच तुम्हाला न्याय देतील.

मराठीची लढाई जिंकूच : स्वागताध्यक्ष पाटील

संमेलानाचे स्वागताध्यक्ष प्रमोद पाटील म्हणाले, १८ वर्षांपासून येळ्ळूरसारख्या ग्रामीण भागात मराठी साहित्याचा जागर सुरु आहे. मराठी भाषा जगवण्याची आणि प्रसार करण्याची आमची लढाई सातत्याने सुरू आहे. एक ना, एक दिवस आम्ही जिंकणारच.

ग्रंथदिंडीचे आकर्षण

येळ्ळूर येथील १९ व्या मराठी साहित्य संमेलनात मराठमोळ्या ग्रंथदिंडीचे दर्शन घडले. टाळ- मृदंगाच्या गजरात दिंडीला चांगळेश्वरी मंदिरपासून प्रारंभ झाला. दिंडीत शाळकरी मुले विविध पोषाख धारण करून सहभागी झाली होती.
दिंडी मार्गावर सुंदर रांगोळ्या घालून सजावट करण्यात आली होती. संमेलनाध्यक्ष श्रीराम पवार, सूर्यकांत शानभाग, ज्योती पठाणीया, प्रमोद पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. चांगळेश्वरी मंदिरपासून सुरू झालेली दिंडी श्री शिवाजी हायस्कूलच्या आवारातील संमेलनस्थळी दाखल झाली.

पुरस्कारांचे वितरण

राष्ट्रवीरकार शामराव 4 देसाई पुरस्कार कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांना, मारुती पेंटर सामाजिक पुरस्कार दलित नेते मल्लेश चौगुले, रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्कार पुणेतील ज्योती पठाणीया, गुरुवर्य गावडोजी पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर, विशेष साहित्य पुरस्कार प्रा. सुनंदा शेळके, कै. कृष्णा मुचंडी पुरस्कार पत्रकार गोपाळ गावडा, क्रीडा पुरस्कार सुजय सातेरी, कृषी पुरस्कार दौलत कुगजी, शैक्षणिक सन्मान डॉ. प्रवीण चिट्टी, डॉ. निकिता कणबरकर यांना देऊन सन्मानित केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *