Friday , November 22 2024
Breaking News

क्रेडाई बेल्काॅन व ऑटो एक्स्पोचा भव्य शुभारंभ

Spread the love

 

बेळगाव- क्रेडाई बेळगाव, यश इव्हेंट व बेळगाव कॉस्मो राउंड टेबल 237 आयोजित बेल्काॅन व ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी 5.30 वा सीपीएड मैदानावर संपन्न झाला. कर्नाटक क्रेडाईचे अध्यक्ष प्रदीप रायकर आणि क्रेडाईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल कटारियाजी यांच्या हस्ते प्रवेशद्वारावरील बेल वाजवून वेगळ्या पद्धतीने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष दीपक गोजगेकर आणि इव्हेंट चेअरमन आनंद अकणोजी यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर क्रेडाईच्या महिला विंगच्या वतीने सुहासिनीनी आरती ओवाळून प्रवेशद्वारावर पाहुण्यांचे स्वागत केले.
सदर प्रदर्शन दि. 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान होत असून यामध्ये 220 स्टाॅलची मांडणी करण्यात आली आहे.
बेल्कॉन प्रदर्शन स्टेट बँक ऑफ इंडिया, विक्रम टीएमटी, युनियन बँक, बालाजी रेडी मिक्स काॕंक्रीट, एस जे इंडस्ट्रीज, तिरुपती बालाजी मार्बल यांनी प्रायोजित केले आहे. तर ऑटो एक्सपो सुंदरम मोटर्स, वर्षा ऑटोमोबाईल्स, ऑडी, बी वाय डी, कॅनरा बँक, फोल्कस् वॅगन आणि वेगा यांनी प्रयोजित केले आहे.
या प्रदर्शनात बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तूंबरोबरच बेळगाव येथील बहुतेक सर्व बिल्डर्स आणि डेव्हलपर्स सहभागी झाले आहेत. घर बांधणीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच छताखाली मांडण्यात आल्या असून बांधकाम क्षेत्रातील अध्यायावत टाईल्स, पेंट्स, नळ, सिमेंट, मांडण्यात आली आहेत.
बेलकॉनच्या शामीयाण्याला लागूनच उभारण्यात आलेल्या दुसऱ्या भव्य मंडपात ऑटो एक्सपोची मांडणी करण्यात आली आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या पेट्रोल, डिझेल व इलेक्ट्रिक दुचाकी, तिचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. जगप्रसिद्ध अशी काही वाहने येथे मांडण्यात आली असून ती पाहण्याची दुर्मिळ संधी बेळगावकरांना लागली आहे. उद्घाटनानंतर पाहुण्यांनी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली. प्रत्येक स्टॉलवर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान ढोल ताशा यांच्या निनादात स्वागत करून फेटे बांधून पाहुण्यांना प्रदर्शन स्थळी आणण्यात आले. तत्पूर्वी क्रेडाईच्या कार्यालयाचे फीत सोडून पाहुण्यांनी उद्घाटन केले. अशा प्रकारचे भव्य प्रदर्शन बेळगाव क्रेडाईने आयोजित केल्याबद्दल दोन्ही पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले आणि बेळगाव क्रेडाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर, सेक्रेटरी युवराज हुलजी, खजिनदार प्रशांत वांडकर, इव्हेंट चेअरमन आनंद अकणोजी, उपाध्यक्ष गोपाळराव कुकडोलकर, यांच्यासह राजेश माळी, सचिन बैलवाड, अभिषेक मुतगेकर, आनंद तुडवेकर, ज्ञानेश सायनेकर, सुनिल पुजारी, यश इव्हेंट्सचे प्रकाश कालकुंद्रीकर, अजिंक्य कालकुंद्रीकर आणि विनय कदम हे परिश्रम घेत आहेत .
याप्रसंगी सागर कल्लेहोळकर, अमर अकणोजी, मदन देशपांडे, राहुल बांडगी, माजी अध्यक्ष राजेश हेडा, सुधीर पानारे, चैतन्य कुलकर्णी, राजेंद्र मुतकेकर, गोविंद टक्केकर, किल्लेकर, परशराम नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महिला विंगच्या दीपा वांडकर करुणा हिरेमठ, अपर्णा गोजगेकर, सीमा हुलजी, अर्पणा कल्लेहोळकर, अश्विनी बांडगी, अमृता अकणोजी, सविता सायनेकर, सायली अकणोजी, भारती हिरेमठ, देवकी माळी, राजश्री मुतकेकर, चिन्मयी बैलवाड, अनुश्री बैलूर, लक्ष्मी पाटील, अनंत पाटील, सुभाष देसाई, श्रीकांत ओऊळकर, गजानन फगरे, आरिफ नाईक, क्रांती खाडे आदी उपस्थित होत्या.

उद्या विद्यार्थ्यांच्यासाठी स्पर्धा
क्रेडाईच्या वतीने बेल्काॅन प्रदर्शनात आर्किटेक्चर आणि सिव्हिल डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी फसाद मॉडेल मेकिंग व सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शुक्रवार दि. 23 फेब्रुवारी रोजी या स्पर्धा ग्राउंडवर उभारण्यात आलेल्या शामियाण्यात होतील. इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना

Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *