बेळगाव : क्रेडाई आणि यश इव्हेंट्स यांनी गेल्या 22 फेब्रुवारीपासून येथील सीपीएड मैदानावर सुरू केलेल्या बेल्कॉन या बांधकाम व्यवसायाशी संबंधित आणि ऑटो एक्स्पोचा या सर्व प्रकारच्या वाहनासंदर्भात सुरू केलेल्या प्रदर्शनाला समस्त
बेळगावकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. असे असले तरी रविवार हा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.
शनिवारी विविध स्पर्धांचे आयोजन
या प्रदर्शना निमित्ताने शनिवारी ‘टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवणे’ याचबरोबर ‘दोघांनी गाण्याच्या स्पर्धा’ आयोजित करण्यात आल्या होत्या. टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या स्पर्धेत 32 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यामध्ये महिला विद्यालय, के एल एस, के एल ई, डी पी, सेंट मेरी, सेंट जोसेफचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांनी अनेक चांगल्या वस्तू बनवल्या. या स्पर्धेच्या आयोजन दिपा वांडकर, करुणा हिरेमठ, सविता सायनेकर, अपर्णा कल्लेहोळकर, सीमा हूलजी, लक्ष्मी पाटील आणि क्रांति खर्डे या क्रेडाईच्या महिला विंगच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून नम्रता कडूकर व श्रद्धा डोंगरे यांनी काम पाहिले.
गायन स्पर्धा
त्यानंतर बाप लेक किंवा आजोबा व नात यांनी गाण्याची स्पर्धा “मिले सुर मेरा तुम्हारा “आयोजित केली होती. या स्पर्धेत 24 गटानी भाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अजिंक्य कुडतरकर व जयश्री नायक यांनी काम पाहिले. दीपा वांडकर, नीता जवळकर, अपर्णा गोजगेकर, सायली पाटील आदींनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
उद्या रंग भरणे व चित्रकला स्पर्धा
रविवारी सकाळी बालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रंग भरणे व चित्रकला काढणे स्पर्धेत 160 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे.
बक्षीस वितरण उद्या सायंकाळी
या सर्व स्पर्धा मधील विजेत्यांना रविवारी सायंकाळी चार वाजता पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहेत.
ऑटो एक्स्पोलाही गर्दी
ऑटो एक्सपोमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या दुचाकी आणि चार चाकी मांडण्यात आल्या असून अनेकांनी वाहनांची पाहणी केली. खास करून इलेक्ट्रिक वाहने राईड घेताना लोक दिसत होते.
आज दिवसभरात अनेक परिवारांनी सहकुटुंब भेट देऊन या प्रदर्शनात सहभाग दर्शवला त्याबद्दल क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.