Sunday , September 8 2024
Breaking News

टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा; गोविंद टक्केकर यांचा उपक्रम

Spread the love

 

बेळगाव : गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली. त्यामुळे यावर्षी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यावरच पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. याची काळजी घेऊन सुळगा, देसुर, राजहंसगड यरमाळ या चार गावांसाठी टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा गेल्या मंगळवारपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती श्रीराम बिल्डर डेव्हलपर्सचे मालक श्री. गोविंद टक्केकर यांनी दिली आहे. हा उपक्रम सुरू करताना गोविंद टक्केकर यांचे काका अर्जुन मलाप्पा टक्केकर, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन अध्यक्ष अविनाश पाटील, राजू बांदिवडेकर, आनंद कुलकर्णी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
गोविंद टक्केकर यांनी पुढील काळात अनेक विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, “आजोबा मलाप्पा टक्केकर यांना मला मल्ल बनविण्याची इच्छा होती. मात्र परिस्थितीमुळे मला स्वतःला मल्ल होता आले नाही. मात्र आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती संघटनेच्या कार्याला सहकार्य करित आहे. प्रत्येक वर्षी बेळगावात कुस्त्यांची दंगल भरविण्यासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे. व्यसनांकडे वळलेल्या युवा पिढीला व्यायामाची आवड लागावी यासाठी प्रयत्न करणार आहे.
सावळाराम मेस्त्री म्हणून ओळखले जाणारे माझे वडील रामचंद्र टक्केकर यांच्या बांधकाम व्यवसायाला पुढे नेत आहे. पूर्वीपासूनच सामाजिक कार्याची आवड होती. जायन्ट्स मेनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेतला. अनेक मंदिरांना आर्थिक सहाय्य केले. वारकरी मंडळींचा सत्कार केला. स्वतःच्या मालकीच्या जागेत सूळगे गावी वृद्धाश्रम सुरू करणार आहे. गावात सेंद्रिय शेतीवर भर देऊन काम केले जात आहे. स्वतःच्या सुळगा येथील शेतातील जागेत कुपनलिका खोदून टाकीद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याचबरोबर माझ्या सुळगा गावच्या आसपास असलेल्या देसूर, राजहंसगड, यरमाळ या गावांनाही टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जाणार आहे. टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा हा पावसाळा सुरू होईपर्यंत केला जाणार आहे. पुढील काळात युवकांसाठी विशेष उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून भारतीय खेळ आणि व्यायामाची आवड जोपासावी यासाठी विशेष उपक्रम राबविणार आहोत, असेही टक्केकर यांनी स्पष्ट केले.
हा उपक्रम सातत्याने चालू ठेवल्याबद्दल ग्रामस्थांनी श्री. टक्केकर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *