
बेळगाव : सध्याच्या जगात परवलीचा मंत्र बनलेल्या डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांनी संघटित व्हावे असे आवाहन विचार अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. दक्षिण भारतातील पहिल्या डिजिटल न्यूज असोसिएशनचा कार्यक्रम नुकताच हॉटेल संकमच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या उपस्थित होत्या त्यांनी रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेठ यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करण्यात आले. मनपातील विरोधी घटनेचे मुजम्मिल डोणी यावेळी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी संघटनेला शुभेच्छा दिल्या. संघटनेचे उपाध्यक्ष रत्नाकर गवंडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच प्रवक्ते इकबाल अहमद जकाती यांनी संघटनेचा उद्देश स्पष्ट केला. डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले स्मार्टन्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर, बेळगाव लाईव्हचे संचालक प्रकाश बिळगोजी, बेळगाव वार्ताचे संपादक सुहास हुद्दार यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष महादेव पवार आणि दीपक सुतार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. प्रसाद कंबार आणि कृष्णा शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta