Friday , December 12 2025
Breaking News

समितीला तळागळात पोचविण्यासाठी वॉर्डनिहाय कार्यकारिणी करणे गरजेचे

Spread the love

 

बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत विधानसभा मतदारसंघनिहाय उत्तर व दक्षिण विभागातील युवकांना प्राधान्य देण्यात आले असून यामध्ये जुन्याजाणत्या नेत्यांसोबत नव्या दमाच्या तरुण कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात आले आहे. म. ए. समिती तळागाळात पोचविण्यासाठी नवीन कार्यकारिणी प्रयत्न करेल, अशी आशा समिती कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. शहर म. ए. समितीच्या नूतन कार्यकारिणीची बैठक रविवार दि. 10 रोजी मराठा मंदिरमध्ये झाली. यावेळी म. ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रारंभी मदन बामणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ते म्हणाले की, समितीच्या मुख्य प्रवाहात युवकांना सहभागी करून घेण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. सीमालढा आणखी तीव्र करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांसोबत युवकांना सामावून घेण्याचा प्रयत्न या कार्यकारिणीत करण्यात आला आहे.
नवीन कार्यकारिणीत प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात आले आहे. समिती तळागळात पोचविण्यासाठी भविष्यात वॉर्डनिहाय कार्यकारिणी करणे गरजेचे आहे, त्याचबरोबर एक व्यक्ती एक पद याप्रमाणे समितीची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यास विरोध दर्शविलेल्या “त्या” उद्योजकाचा बैठकीत निषेध करण्यात आला.

प्रत्येक कार्यकर्ता हा नेताच

म. ए. समिती ही सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी निर्माण झालेली संघटना आहे. या संघटनेतील पदाधिकारी केवळ पदाच्या अपेक्षेने याठिकाणी येत नाहीत. प्रत्येक कार्यकर्ता हा नेताच असल्याने प्रत्येकाने आपण निष्ठेने म. ए. समितीचे कार्य केले पाहिजे. प्रत्येकाला कार्यकारिणीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात असून ज्यांची नावे अद्याप या कार्यकारिणीवर नाहीत. त्यांची नावे कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी नितीन खन्नूकर यांनी केली.

यावेळी रणजीत चव्हाण-पाटील, नरेश पाटील, महादेव पाटील, सुनील देसूरकर, नगरसेवक रवी साळुंखे, ऍड. अमर येळ्ळूरकर, सागर पाटील, श्रीकांत कदम, अंकुश केसरकर, रणजीत हावळाण्णाचे, ज्ञानेश्वर मण्णूरकर, राजू बिर्जे, सतीश पाटील, प्रमोद पाटील, मनोहर हलगेकर, प्रशांत भातकांडे, सुनील बोकडे, किरण परब, रमाकांत कोंडुस्कर, संजय शिंदे, मोतेश बार्देशकर, किरण धामणेकर, पियुष हावळ, गणेश दड्डीकर, श्रीकांत मांडेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते व नेत्यांनी आपली मते व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे समिती कार्यकर्त्यांचे जाहीर आभार

Spread the love  बेळगाव : दिनांक आठ डिसेंबर 2025 रोजी कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *