बेळगाव (वार्ता) : बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम मदनकुमार भैरप्पन्नावर यांनी शांताई वृद्धाश्रमाला 50 हजारांची देणगी दिली आहे. शनिवारी आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही देणगी दिली आहे.
शांताई वृद्धाश्रमाच्या प्रेरणास्थान शांताई भरमा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून मदनकुमार भैरप्पन्नावर यांनी हा निधी सुपूर्द केला. त्यावेळी शांताईचे व्यवस्थापक नागेश चौगुले, कार्याध्यक्ष विजय मोरे आणि संस्थापक अध्यक्ष विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शांताईच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य फार मोठे आहे. या कामासाठी समाजातून मदतीचा ओघ येत असतो. या ओघात आपला ही एक वाटा असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta