Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव लोकसभेसाठी समिती देणार उमेदवार! ३२ जणांच्या निवड समितीमध्ये शिक्कामोर्तब!

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लोकसभेला एक उमेदवार देण्यावर ३२ जणांच्या निवड समितीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऍड. राजाभाऊ पाटील होते. मंगळवार दिनांक २ एप्रिल २०२४ ते ६ एप्रिल २०२४ पर्यंत रोज दुपारी ३.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत रंगुबाई पॅलेस येथे अर्ज स्वीकारण्यात येतील ही अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी मदन बामणे, अंकुश केसरकर व श्रीकांत कदम यांच्यावर सोपवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत २५ हजार रुपये वर्गणी व एक लाख रुपये अनामत रक्कम भरण्याचे आहे.

बैठकीला माजी आमदार मनोहर किनेकर, रणजित चव्हाण पाटील, एम.जी.पाटील, आणि इतर सर्व निवड समिती सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *