बेळगाव : शहरातील युवक सुशांत संजय सांगूकर (गोंधळी गल्ली), मृणाल मधुकर काकतकर (हिंडलगा), कौशिक शिवाजी भातकांडे व प्रियेश किरण लोहार (दोघे भातकांडे गल्ली) हे चौघेजण बेळगाव ते लेह लडाख प्रवासासाठी दुचाकीवरून बुधवार दिं.12 रोजी सकाळी रवाना झाले. चार युवकांची ही तुकडी बेळगाव ते दिल्ली, दिल्ली ते लेह लडाख व पुन्हा बेळगांव असा जवळजवळ 6615 किलो मीटरचा प्रवास दुचाकीवरून करणार आहेत. बेळगाव ते दिल्ली हा 1800 किलो मीटरच्या प्रवासानंतर ते दिल्ली ते मनाली (520 कि.मी.), मनाली ते बरालाच्या पास (145 कि.मी.), बरालाच्या पास व्हाया गट्टा लूप्स ते सर्चु (80 कि. मी.), सर्चुलुप्स ते पांगगांग लेक (330 कि.मी.), पांगगांग लेक ते लेह (150 कि.मी.), लेह ते खारदुंगला पास (70 कि.मी.), खारदुंगला पास ते नुब्रा व्हॅली (90कि.मी.), नुब्रा व्हॅली परत लेह (160कि.मी.) लेह ते मॅग्नेटिक हिल (28 कि.मी.), मॅग्नेटिक हिल ते कारगिल (190 कि.मी.), कारगिल ते भाया सोनमर्ग जोजीला पास (120कि.मी.), जोजीला पास ते श्रीनगर (100 कि.मी.), श्रीनगर ते कचरा वैष्णोव देवी (240 कि.मी.), वैष्णव देवी ते जम्मू (60 कि.मी.), जम्मू ते हरिद्वार (540 कि.मी.), हरिद्वार ते दिल्ली (210 कि.मी.), दिल्ली ते बेळगाव (1800 कि.मी). असा ते प्रवास करणार आहेत. या चार तरुणांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.