बेळगाव : येथील बेळगाव स्मार्ट सिटी नियमित कार्यालयास खासदार जगदीश शेट्टर यांनी भेट देऊन प्रगती आढावा बैठक घेतली. या बैठकीत खासदारांनी स्मार्ट सिटीत सुरू असलेली कामे आणि सद्यस्थितीची माहिती घेतली. याशिवाय बहुतांश कामे पूर्ण झाली असून ही कामे महानगर, महामंडळ व संबंधित विभागाकडे तातडीने सोपवावीत, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आम.अभय पाटील उपस्थित होते. यावेळी बेळगाव स्मार्ट सिटीतर्फे नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांचा सत्कार करण्यात आला. बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती सय्यदा आफरीन बानू बेल्लारी यांनी खासदार व आमदारांचे स्वागत केले.
प्रगती आढावा बैठकीनंतर खासदारांनी स्मार्ट सिटीने विकसित केलेल्या डिजिटल लायब्ररी, महात्मा फुले पार्क, कलामंदिर आणि सीबीटीच्या कामांना भेट देऊन कामांचे निरीक्षण केले. यावेळी आमदार अभय पाटील, स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक सय्यदा आफरीन बानू बेल्लारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta