बेळगाव : एक्टिवा दुचाकीवरून रस्त्यात पडल्याने त्यानंतर डंपरच्या मागच्या चाकात सापडून महिला जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना उद्यमबाग येथील बेमको क्रॉसजवळ बुधवारी सायंकाळी चार वाजता सुमारास घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पल्लवी मदली वय अंदाजे ५५ रा. मजगाव असे मयत महिलेचे नाव आहे. सदर घटनेनंतर रहदारी दक्षिण पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. उद्यमबाग मार्ग हा दुचाकी वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे याची प्रत्यंतर पुन्हा एकदा आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta