बेळगाव : येथील एसकेई सोसायटीच्या ठळकवाडी हायस्कूलमध्ये 25 बटालियन एनसीसी ट्रूपच्या वतीने जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून पतंजली योग संस्थेचे उत्तर कर्नाटक प्रमुख योग, गुरु श्री. किरण मन्नोळकर यांना मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
प्रारंभी एनसीसी कमांडर एस. एन. गावडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शिक्षक सुरेश भातकांडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. मुख्याध्यापक आर. आर. कुडतुरकर यांनी पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर योग गुरु श्री. किरण मन्नोळकर यांनी विद्यार्थ्यांना योग विषयक प्रशिक्षण दिले आणि योगाचे महत्त्व पटवून दिले. निरोगी जीवन जगण्यासाठी माणसाला योग आणि व्यायाम कशाप्रकारे मदत करू शकते याविषयी त्यांनी सर्वांना माहिती दिली.
यावेळी एनसीसी छात्र कु. प्रणाली धामणेकर, कु. स्मिता नंदिहळ्ळी यांनी जागतिक योग दिन विषयी भाषण केले. शिक्षक श्री. सी. वाय. पाटील यांनी आभार मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. एस. जी. बाळेकुंद्री, श्री. के. एम. गुरव आणि शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta