बेळगाव : वडगाव येथे होणाऱ्या मंगाई देवी यात्रेत पशुबळीला बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शुक्रवारी बजावला आहे. पशुबळी देताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
यात्रा काळात मंदिर आवारात किंवा वडगाव परिसरात मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या यासारख्या पशुंचा बळी देण्यात येतो. विश्वप्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष व विश्व गोरक्षा महापिठाचे मुख्य संचालक दयानंद स्वामी यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील व शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांची भेट घेऊन, वडगाव मंगाई यात्रेत पशुबळीला बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पशुबळी बंदी आदेश बजावला आहे.