Thursday , March 5 2026
Breaking News

मालमत्तेसाठी करणीबाधा : सिदनाळ कुटुंबीयांवर गुन्हा दाखल; विजय संकेश्वर यांच्या मुलीची तक्रार

Spread the love

 

बेळगाव : प्रख्यात व्यापारी विजय संकेश्वर यांची मुलगी दीपा सिदनाळ हिने त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांनी व्यापारी शशिकांत सिदनाळ, त्यांची पत्नी वाणी सिदनाळ आणि मुलगा दिग्विजय सिदनाळ यांच्यावर करणीबाधा केल्याचा आरोप करून बेळगाव येथील कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
माजी खासदार एस. बी. सिदनाळ यांचा मुलगा शिवकांत यांचे नुकतेच निधन झाले. शशिकांत सिदनाळ यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मालकीची विजयकांता डेअरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी त्यांच्यावर करणीबाधा करण्यात आली. याशिवाय पती शिवकांत यांच्या समाधीवरही जादूटोणा करण्यात आला. शशिकांत यांनी भागीदारी आणि मालमत्ता हडप करण्याचा कट रचल्याची तक्रार केली आहे, याविषयी बोलताना पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये शशिकांत सिदनाळ, पत्नी वाणी सिदनाळ, मुलगा दिग्विजय सिदनाळ यांच्यावर आयपीसी 1860, कलम नुसार जादूटोणा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. 120बी, 506, 307., काळी जादू कायदा 2007 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. असे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *