बेळगाव : श्री संस्थान शांताश्रम काशी तथा हळदीपूर चे मठाधिपती श्री श्री वामनाश्रम स्वामीजी वैश्य समाज बांधवांना प्रबोधन करण्याकरिता शुक्रवार दिनांक ५ जुलै रोजी बेळगाव नगरीत गोवावेस येथील श्री चिदंबर राजाराम महाराज व पांडुरंग महाराज समाधी मंदिर शाखा मठ येथे वास्तव्याला आले होते. यावेळी श्री श्री वामनाश्रम स्वामीजी रविवार दिनांक ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वैश्य समाज बांधवांना आशीर्वचन करताना आपल्या मठाचा पूर्व इतिहास कथन केला. त्यानंतर फलमंत्राक्षता वाटप श्री श्री वामनाश्रम स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी बहुसंख्येने समाज बांधव भगिनी युवक युवती उपस्थित होते. उत्सव यशस्वी करण्यासाठी शाखा मठ अध्यक्ष बापूसाहेब अनगोळकर, विशाल मुरकुंबी, सुरेंद्र मिठारी, सुभाष अंगडी, अशोक मुरकुंबी, मधुसूदन किनारी, शाम नाकाडी, सोमशेखर नाकाडी, काशिनाथ कुदळे, गजानन गावडे, विकास कलघटगी, सतीश अनगोळकर, मंडळाने परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta