बेळगाव : बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यात घरफोडी केल्या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
बेळगाव तालुक्यातील मूळचा किणये गावातील, सध्या सरस्वतीनगर गणेशपूर येथील चेतन मारुती शिंदे (२६) आणि करण उत्तम मुतगेकर (२७) रा. अनगोळ या दोघांना खडेबाजार पोलीस ठाणे आणि कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अटक करण्यात आली. बेळगाव शहरातील खडेबाजार, कॅम्प आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील तीन घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या या आरोपींकडून 77 ग्रॅम सोन्याचे दागिने, 200 ग्रॅम चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि 10 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta