
बेळगाव : समता भगिनी मंडळाकडून सदाशिवनगर येथील शाळा क्रमांक 41 मधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत विविध प्रजातीची झाडे लावण्यात आली. यावेळी या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व पटवून देत मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
यावेळी मंडळातील सभासद अंजलीताई गाडगीळ, मीनाताई नाडगौडा, सुमित्राताई मुचंडीकर, सीमा अकलेकर, सोनल सौदागर रंजना हेरेकर, सुवर्णा मेलगे, माधुरी माळी, कोमल हुडलिकर, मधुरा गाडगीळ यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta