Thursday , March 5 2026
Breaking News

श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी स्कूल व हायस्कूल येळ्ळूर येथे आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडीचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर येथे दि. 16 जुलै आषाढी एकादशी निमित्त श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी स्कूल व हायस्कूलच्या वतीने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले.
शाळेच्या प्रांगणातून दिंडीची सुरुवात झाली यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी वारकऱ्यांच्या रूपात विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, पुंडलिक, माऊली अशा विविध वेशभूषेत गावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात टाळ मृदंगाच्या साथीने विठ्ठलाच्या नाम घोषात पोहोचली. यानंतर मंदिरात दर्शन घेऊन पारंपारिक पद्धतीने पूजा, आरती झाल्यावर विद्यार्थी विद्यार्थिनी फुगडी घालण्याचा आनंद घेतला. सदर दिंडी गावातून पुन्हा शाळेकडे मार्गस्थ झाली.
गल्लीतून दिंडीचे प्रस्थान होत असताना बऱ्याच स्त्रियांनी बाल वारकऱ्यांच्या अंगावर फुले,आरती करुन पायावर पाणी घालून स्वागत केले. तानाजी गल्लीतून मार्गस्थ होत असताना संस्थापक वाय. एन. मजुकर व कुटुंबियानी दिंडीचे स्वागत करून बाल वारकऱ्यांना गोड खाऊ दिला. दिंडी यशस्वी करण्यासाठी हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर, हायर प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत यांनी नियोजन केले. ही दिंडी यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक तसेच पालकानी सहकार्य केले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *