Sunday , September 8 2024
Breaking News

रोटरीच्या पुढाकारामुळे दोन वर्षीय बालिकेला मिळाले जीवदान

Spread the love

 

बेळगाव : अपघातामुळे ब्रेन डेड झाल्याने सौंदत्ती येथील हिरेबुदनूर गावातील २४ वर्षीय हणमंत सारवी यांच्या कुटुंबीयांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. या दुःखाचा सामना करत असूनही कुटुंबीयांनी घेतलेला अवयव दानाचा निर्णय कौतुकास्पद ठरला.
पण दुर्दैवाने वडिलांच्या अवयव दानानंतर २ वर्षीय मुलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. मात्र कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या मुलीच्या उपचारासाठी निधी उभारणे कुटुंबियांना शक्य नव्हते. मात्र रोटरी क्लब ऑफ बेळगाव (दक्षिण)च्या पुढाकारातून सदर मुलीला जीवदान मिळाले आहे. या २ वर्षीय मुलीला एट्रियल सेप्टल डिफेक्ट या नावाने ओळखला जाणारा जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान झाल्यामुळे कुटुंबाच्या दु:खात आणखी भर पडली. मात्र या मुलीवर उपचार करण्याचा निर्णय रोटरी क्लब ऑफ बेळगाव दक्षिणच्या “गिफ्ट ऑफ लाइफ” उपक्रमंतगर्त घेण्यात आला आणि ज्येष्ठ बालरोग हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वीरेश मानवी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गणंजय साळवे आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तसेच कार्डियाक ऍनेस्थेटिस्टच्या टीमने डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.

रोटरी क्लब बेळगाव दक्षिणचे सदस्य नीलेश पाटील, भूषण मोहित्रे, अनुदान समन्वयक चैतन्य कुलकर्णी आणि आरती अंगडी यांनी हॉस्पिटलला भेट देऊन मुलीच्या प्रकृतीची चौकशी करून कुटुंबियांना धीर दिला.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *