

बेळगाव : आंबेवाडी येथील राजा श्री छत्रपती शिवस्मारक सेवा संघ आंबेवाडी नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती स्थापनेचा चौथरा स्लॅब भरणी कार्यक्रम म. ए. समितीचे युवा नेते श्री. आर. एम. चौगुले व अध्यक्षा सौ. लक्ष्मी येळगुकर यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी शिवाजीराव अतिवाडकर हे होते. दीपप्रज्वलन माजी नगरसेवक उद्योजक बाळासाहेब धामणेकर त्याचबरोबर हरीश भाई पटेल, सी एम पाटील, मंजुनाथ गरज, सुरज निलजकर, एम एस नवलगट्टी यांच्या हस्ते झाले. तसेच काँक्रीट मशीन पूजन प्रकाश धोपे यांनी केले.
यावेळी सुनील राक्षे, अनंत तुडेकर, प्रमुख वक्ते म्हणून निवृत्त प्राचार्य श्री. भाऊराव निळू कातकर, त्याचबरोबर गावातील सर्व स्थरातील मान्यवर मंडळी व युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते
Belgaum Varta Belgaum Varta