बेळगाव : अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी श्री ब्रह्मदेव मंदिर परिसर मजगांव या ठिकाणी रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी वृक्षारोपण मोहीम आयोजित केले होते.
वृक्षारोपण समारंभासाठी श्री ब्रह्मदेव मंदिरचे चेअरमन शिवाजी पठण, श्री संप्रदाय सेवा केंद्र बेळगाव शहर जिल्हा अध्यक्ष मंजुनाथ कडकोळ, जिल्हा महिला अध्यक्ष शांता इंचल, आदीसह स्थानिक भक्तगण उपस्थित होते.
या उपस्थितांना संबोधित करताना जिल्हा महिला अध्यक्ष शांता इंचल यांनी वृक्षारोपणांचे महत्त्व पटवून दिले.
या मोहिमेदरम्यान विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली असून, त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. पर्यावरण जागरूकता वाढवणे आणि हिरवेगार, आरोग्यदायी वातावरणात निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.
श्री संप्रदाय सेवा केंद्राचे अध्यक्ष मंजुनाथ कडकोळ यांनी स्थानिक नागरिकांच्या पाठिंब्याचे कौतुक केले व गजानन पायानाचे यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हा कमिटी तालुका कमिटी सेवा केंद्र कमिटीसह युवा प्रमुख निखिल सूभांजी, जिल्हा सचिव सागर हुंदरे, बाळकृष्ण सायनेकर, सुरेखा पाटील, बलराम गुगाडे, मंगेश वाघवडेकर, नींगापा यळूरकर, शिवाजी जायानाचे, महादेव पाटील, लक्ष्मण नौकुडकर, राहुल सायनेकर, अपाजी शिंदोळकर, रामा लाड, सिध्देश्वर करडी, प्रशांत धामणेकर, गणेश वेरणेकर, प्रमोद इंचल भरमा मरगाळे व इतर भक्तगण उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta