Tuesday , April 21 2026
Breaking News

कृष्णा नदीचा रौद्रावतार; नदीकाठचा पुराचा धोका

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्रातील संततधार पावसामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. महाराष्ट्रातील सांगलीमार्गे कर्नाटकात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून पुराचा धोका निर्माण झाला आहे.
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत क्षणोक्षणी वाढ होत आहे. महाराष्ट्रातील सांगली शहरात शिरलेले पाणी कर्नाटकातही शिरले आहे. महाराष्ट्रातील कृष्णा नदीचे पाणी सांगली शहरात दाखल झाले आहे. कृष्णा नदीत 2 लाख 52 हजार क्युसेकपेक्षा जास्त आवक आहे. आवक तीन लाख क्युसेकच्या पुढे गेल्यास नदीकाठच्या अनेक गावांना पुराचा धोका असून, बेळगाव जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *