बेळगाव : पॅरिस ऑलिम्पिक – २४ मध्ये कांस्य पदक जिंकलेल्या भारतीय हॉकी संघाचा विजयोत्सव बेळगावमध्ये साजरा करण्यात आला. शुक्रवारी हॉकी बेळगावच्या सदस्यांसह खेळाडूंनी एकत्रित येऊन धर्मवीर संभाजी चौक येथे बेळगावचे ऑलिम्पिक हॉकीपटू बंडू पाटील यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बेळगाववासीयांना १०० किलो मिठाई वाटप करण्यात आली आणि विजयाचा जयजयकार करण्यात आला.
जिल्हा हॉकीचे सचिव सुधाकर चाळके, राज्य प्रशिक्षक उत्तम शिंदे यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हा पदाधिकारी पूजा जाधव, विनोद पाटील, मनोहर पाटील, नामदेव सावंत, अश्विनी बस्तवाडकर, विकास कलघटगी, संजय शिंदे, दयानंद कारेकर, संतोष दरेकर, श्रीकांत आजगावकर, संभाजी पवळे, गणपत गावडे, प्रशांत माणके, हायस्कूल मंडलाधिकारी जवखेडेकर, डॉ. यावेळी हॉकीच्या मुली व हितचिंतक उपस्थित होते. डीएस चौकात फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta