बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन)च्या वतीने आज गोवावेस येथील न्यू गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थिनीना शूज वितरणाचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी जायंट्सचे अध्यक्ष अविनाश पाटील, संजय पाटील, लक्ष्मण शिंदे, शिवराज पाटील, विजय बनसुर, यल्लाप्पा पाटील, मधु बेळगावकर, विश्वास पवार, भरत गावडे, मोहन पत्तार, दिगंबर किल्लेकर इत्यादी हजर होते. न्यू गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. घाडी सर यांनी सर्वांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta