बेळगाव : पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ उद्या दि. 17 रोजी बेळगावातील सरकारी, खासगी रुग्णालयांची ओपीडी सेवा बंद राहणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे बेळगावचे अध्यक्ष डॉ. रवींद्र अनगोळ यांनी दिली.
पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेला आठवडा उलटून गेला तरी सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. काम संपवून झोपेत असताना वैद्यकीय तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हॉस्पिटलवर हल्ला करून फर्निचरची नासधूस केली. डॉक्टरांवर वारंवार होत असलेल्या अशा घटनांचा निषेध करूनही सरकार कोणतीही कारवाई करत नाही. महिला डॉक्टर आणि महिला विद्यार्थीनीना सरकार कोणतीही सुरक्षा सुविधा देत नाही. न्यायासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. रुग्णालयांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण केले पाहिजे. अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी.
कोलकात्ता घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या बेळगाव जिल्ह्यातील सरकारी, खाजगी दवाखाने आणि रुग्णालयांच्या ओपीडी आणि आयपीडी सेवा बंद ठेवणार आहोत. केवळ आपत्कालीन सेवा उपलब्ध असतील असे त्यांनी सांगितले. उद्या सकाळी 06:00 ते 06:00 पर्यंत सेवा बंद करू. आम्ही 24 तास आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सेंट्रल मेडिकल असोसिएशनच्या निर्देशानुसार आम्ही निर्णय घेऊ, असे आयएमएचे अध्यक्ष डॉ. रवींद्र अनगोळ यांनी सांगितले.
कोलकाता येथील स्थानिक डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचा निषेध करण्यासाठी आयएमएने पुकारलेल्या निषेधाचा एक भाग म्हणून केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राचा बाह्यरुग्ण विभागही 17 ऑगस्ट 2024 रोजी कार्यरत नाही. परंतु अपघात आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा, वॉर्ड, प्रयोगशाळा नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील. त्यामुळे जनतेने लक्ष द्यावे ही विनंती.