Thursday , March 5 2026
Breaking News

रामदेव गल्ली वडगाव येथे 3 मूर्तींची प्रतिष्ठापना कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : रामदेव गल्ली, माधवपूर -वडगाव येथे श्री हनुमान, श्री नागदेवता, श्री शिवलिंग व नंदी यांची प्रतिष्ठापना व नव्या मंदिराची वास्तुशांती, विधिवत हवन वगैरे कार्यक्रम बुधवार दि. 21 ऑगस्ट ते शुक्रवार दि. 23 ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात आले आहेत.
अनेक देणगीदारांच्या देणगीतून या परिसराचा कायापालट करण्यात आला असून तेथे या मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. बुधवारी दुपारी 3 वा. या सर्व मूर्तींची मिरवणूक श्रीराम मंदिर, रामदेव गल्ली येथून निघणार असून सोनार गल्ली, बाजार गल्ली व परिसरात फिरून त्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी आणल्या जातील. हरीष तेरगावकर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार असून 22 ऑगस्ट रोजी सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत होम हवन, नवग्रह पूजा, अभिषेक, वास्तुशांती आदि कार्यक्रम होणार आहेत. तर 23 ऑगस्ट रोजी कळसारोहन, श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याप्रसंगी भाविकांनी उपस्थित रहावे तसेच वस्तू अथवा रोख रक्कम देणगी स्वरूपात द्यायची असेल तरी कमिटीला संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष गोपाळराव सूर्यवंशी व सेक्रेटरी विजय बनसुर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *