बेळगाव : प्रत्येक वर्षी लक्ष्मीकांत कांबळे हे आपली कन्या कृतिका लक्ष्मीकांत कांबळे हिच्या वाढदिवसानिमित्ताने बऱ्याच ठिकाणी अन्नदान करत असतात. पण यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांनी माधुरी जाधव फाउंडेशन यांच्याकडे गरजू विद्यार्थ्यांच्या करिता आर्थिक मदत पोहोचविली. फाउंडेशनच्या संस्थापिका माधुरी जाधव यांनी ही मदत श्रीधर केसरकर आणि संजना अगनोजी या विद्यार्थ्यांच्याकडे सुपूर्द केली. विद्यार्थ्यांच्या पालकांनी लक्ष्मीकांत यांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक फाउंडेशनचे कार्यकर्ते सौरभ काशीलकर, वसीम, ताजो हे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta