बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन)च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा उत्साहाने पार पडला. श्री श्री गोकुलानंद मंदिरात आठवडाभर विविध कार्यक्रम संपन्न झाले. सोमवारी मध्यरात्री जन्माष्टमी उत्सवाची सांगता इस्कॉन चे अध्यक्ष भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या जन्माष्टमी वरील व्याख्यानाने झाली. तर मंगळवारी संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिन व्यासपूजा म्हणून साजरा करण्यात आला.
प्रभूपादांची मूर्ती अतिशय सुंदररित्या फुलांनी सजविलेल्या व्यासपीठावर मांडण्यात आली होती. त्यानंतर नंदनंदन प्रभू, संकर्षण प्रभू, मदन गोविंद प्रभू, विनोद गोपाल प्रभू, नागेंद्र दास, वल्लभ निमाई, वज्रराज गोविंद प्रभू, देवदत्त प्रभू, बलराम, लालकृष्ण, महात्मा, श्याम बिहारी, संजीवनी कृपा, गोपाल, नारायण गौरंग,रामायण यांच्याबरोबरच किशोरी काजोलकर, भक्ती पाटील, श्वेता व शामा पवार, सुरभी माताजी, प्रभावती गोपी, वज्ररानी, रेमुनातीर्थ, शरयू, ललित कुंद, परि पवार व सखी गौरांगी माताजी आदींनी श्री प्रभुपाद यांच्याबद्दल गुणगौरव केले. त्यानंतर अभिषेक घालण्यात आले. त्यानंतर भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे श्रील प्रभुपाद यांच्या जीवनावर व्याख्यान झाले. प्रभूपाद यांनी इस्कॉनची स्थापना करून हिंदूधर्माची पताका जगभर पोहचविण्याचे आणि कृष्ण भक्ती सर्व सामान्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्यांची हे कार्य अनंत काळापर्यंत सदैव स्मरणात राहील” असे ते म्हणाले सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अशाप्रकारे जन्माष्टमी उत्सवाची सांगता झाली.