बेळगाव : धर्मस्थळ धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास योजनेंतर्गत अनेक कार्यक्रम करत असल्याचे ज्येष्ठ वकील जी. आर. सोनेर यांनी सांगितले.
हिंडलगा गणेश सभाभवन येथे श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम विकास प्रकल्पाच्या स्वयंअर्थसहाय्यित संस्थांतर्फे सामूहिक श्रीवरमहालक्ष्मी पूजन व पदग्रहण कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
श्रावण महिन्यात वरमहालक्ष्मीची सामुहिक उपासना राष्ट्रहितासाठी उत्तम आहे हा पवित्र महिना आहे. असेही ते म्हणाले
श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम विकास प्रकल्प बेळगाव तालुका प्रकल्प अधिकारी नागराज हदली, बेळगाव जवाहर नेहरु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ.आरती के हन्नूरकर, श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष रविकुमार कल्लाप्पा कोकितकर यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मन्नूर मंदिर पंच समितीचे अध्यक्ष मुकुंद भावकू तरळे होते. मराठा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनीही या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करून आपले विचार यावेळी व्यक्त केले. हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र आण्णाप्पा मन्नोळकर, गोजगा ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी सुब्बराव यळगे, कृषी पर्यवेक्षक नागराज आब्बीगेरी, पर्यवेक्षक संगिता पुजार, स्वयंसहाय्यता संघाच्या अध्यक्षा, सेवा प्रतिनिधी कविता कदम, जयश्री नाईक, अण्णपूर्णा, लक्ष्मी कांबळे, रेणूका कांबळे, आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta