बेळगाव : हुलबत्ते कॉलनीत जमीन संपादित केल्याप्रकरणी भरपाई न दिल्याने जमीन मालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने महापालिकेला विस्थापित मालमत्ताधारकाला ७५ लाखांची नुकसान देण्याचा आदेश दिला मात्र महापालिकेकडून जमीन मालकाला भरपाई देण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या जमीन मालकाने चक्क महापालिका उपयुक्तांच्या गाडीला नोटीस चिकटवली.
महापालिकेच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त करणारे वकील इंद्रजित बडवाण्णाचे म्हणाले की, शहापूरच्या हुलबत्ते कॉलनीत १५ वर्षांपूर्वी महापालिकेने जमीन संपादित केली होती. याविरोधात आम्ही हायकोर्टात लढा दिला आणि महापालिकेला ७५ लाखांची भरपाई देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. एक तर महापालिकेने नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा येथील वस्तू जप्त करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा ते न्यायालयाचे उल्लंघन ठरेल.