बेळगाव : बेळगाव परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी गेल्या वर्षीपासून त्यांना उत्साहित करण्यासाठी संजीवीनी फौंडेशनच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
गेल्यावर्षी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर या वर्षीही “उमंग २०२४” या नृत्य आणि गायनाच्या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
वृद्धांना आधार या संकल्पनेतून नेहमीच वृद्धांना मदत करण्यासाठी तत्पर असणाऱ्या संजीवीनी फौंडेशनच्या वतीने अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात.
1 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून जेष्ठ नागरिकांच्या अंगभूत वैविध्यपूर्ण कलागुणांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने गायन स्पर्धा, वैयक्तिक नृत्य आणि समूह नृत्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तरी साठ वर्षावरील जास्तीतजास्त स्पर्धकांनी यात भाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सीईओ मदन बामणे आणि संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी केले आहे.
स्पर्धकांनी आपला व्हीडिओ २० सप्टेंबर २०२४ च्या आत ६३६०४७४६२९ या नंबरवर पाठवावा असे कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta