Sunday , July 26 2026
Breaking News

म. ए. समिती नेते मंडळींनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट

Spread the love

 

बेळगाव : सहकार महर्षी कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे जन्मशताब्दी निमित्त सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी माननीय खासदार पद्मविभूषण श्री. शरदचंद्र पवार यांचे मराठा मंदिर बेळगाव येथे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी श्री. पवार साहेबांची महाराष्ट्र एकीकरण समिती नेते श्री. रमाकांतदादा कोंडुस्कर यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान केला. ह्या भेटीदरम्यान त्यांना सीमा प्रश्न विषयी सरकारवर दबाव आणून लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाकडून सहकार्य व्हावे, अशी विनंती केली. यांच्यासोबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, देवस्थान अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर, सागर पाटील, महादेव पाटील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *