बेळगाव : येथील श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते श्री. रमाकांत दादा कोंडुसकर व महालक्ष्मी स्मार्ट इंडस्ट्रीज बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना गृह उद्योग मिळावा आणि दळण दळण्यासाठी घराबाहेर जाऊ नये यासाठी पीठ गिरणी वाटप योजना सुरू केली आहे. त्याचे उद्घाटन महालक्ष्मी स्मार्ट इंडस्ट्रीज स्टार टॉवर आरपीडी कॉर्नर जवळ कॅनरा बँकेसमोर खानापूर रोड टिळकवाडी या मुख्य शाखेत उद्घाटन करून वाटप योजना सुरू करण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रमाकांत दादा कोंडुसकर यांनी केले आहे. महालक्ष्मी स्मार्ट इंडस्ट्रीज ही गेली सोळा वर्षापासून दर्जेदार उत्पादने तयार करण्यात आणि वितरण करण्यात विविध राज्यांमध्ये अग्रेसर आहे. यावेळी श्रीराम सेनेचे तालुकाध्यक्ष भरत पाटील, शहर अध्यक्ष उमेश कुऱ्याळकर, प्राचार्य आनंद आपटेकर, विकास कलघटगी, महालक्ष्मी स्मार्ट इंडस्ट्रीजचे संचालक राम फडतरे, बेळगाव परिसरातील गांधीनगर, येळ्ळूर, अनगोळ, खासबाग येथील महिलावर्ग उपस्थित होता.