Thursday , March 5 2026
Breaking News

येळ्ळूर सिद्धेश्वर मंदिर नूतनीकरण लोकार्पण सोहळा सोमवारी

Spread the love

 

येळ्ळूर : सिद्धेश्वर गल्ली येळ्ळूर येथील सिद्धेश्वर मंदिराचे सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार मंडळ यांच्या पुढाकाराने व गावातील व गावाबाहेरील असंख्य देणगीदारांच्या सहकार्यातून, नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवार (ता. 16) रोजी सकाळी 11-00 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मंदिराचे नूतनीकरण करण्यासाठी असंख्य भाविक भक्त, दानशूर व्यक्ती, येळ्ळूर ग्रामस्थ व येळळूर बाहेरील नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले आहे. मंदिराची वास्तुशांती, प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम येत्या तीन दिवसांमध्ये पार पडणार आहेत. शनिवार (ता. 14) रोजी येळ्ळूर वेशीतून देवी देवतांची मिरवणूक गावामध्ये काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी देवतांचे पूजन व यज्ञ होणार आहे. तर रविवार (ता.15) रोजी महासंकल्प यज्ञ, नवग्रह पूजन, वास्तु होम, गण होम व शांती होम होणार आहे. तर सोमवार (ता.16) रोजी ब्राह्मी मुहूर्तावर विविध देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण करण्यात येणार आहे. तर दुपारी 1:30 ते 4-00 वाजेपर्यंत महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *