बैलहोंगल : तालुक्यातील अमतुर -बेविनकोप्प येथे रस्ता ओलांडल्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एकाचा भोसकून खून केल्याची घटना सोमवारी घडली.
अमतुर गावातील केदारी यल्लाप्पा अंगडी (४२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चाकूने वार केल्याने त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि उपचारासाठी सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचाराविना त्याचा मृत्यू झाला.
आरोपी बाळाप्पा शिवानंद अंगडी (21), शिवानंद बाळाप्पा अंगडी (51), आत्मानंद शिवानंद अंगडी (14) हे फरार झाले आहेत. तीन पीएसआयच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी जाळे पसरविण्यात आले आहे. याप्रकरणी बैलहोंगल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta