बेळगाव : शहर देवस्थान कमिटी व पंच मंडळी यांच्या वतीने येणाऱ्या विजयादशमीच्या सीमोल्लंघनाच्या पूर्वतयारीची बैठक पाटील गल्ली सिद्ध भैरवनाथ मंदिराच्या सभागृहात नुकताच पार पडली. सदर बैठकीत शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा व्यवस्थितरित्या पार पाडाव्या आणि येणारा सीमोल्लंघनाचा कार्यक्रम शिस्तबद्धरित्या पार पाडण्यासंदर्भात तसेच सर्व मानकरी व भक्तमंडळींनी यंदाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना रमाकांत दादा कोंडुसकर म्हणाले की, यंदा मध्यवर्ती नवरात्र-दसरा महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्या महामंडळाच्या माध्यमातून सीमोल्लंघनाच्या मैदानावरती जी काही शासकीय मदत लागेल त्याची पूर्तता करण्यात येईल. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी शिस्तबद्ध नियोजनासंदर्भात महामंडळाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन चर्चा करण्यात येईल.
बैठकीला श्री देवदादा सासनकाठी चव्हाट गल्ली, जालगार मारुती मंदिर चव्हाट गल्ली, बसवाणा देवस्थान बसवाण गल्ली, मारुती मंदिर मारुती गल्ली, मातंग देवस्थान कसाई गल्ली, श्री समादेवी मंदिर समादेवी गल्ली, श्री कपिलेश्वर देवस्थान, अष्टेकर दादा देवस्थान नार्वेकर गल्ली, या सर्व देवस्थान कमिटीचे सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर रणजीत चव्हाण- पाटील, रमाकांत कोंडुसकर, परशराम माळी, विजय तमुचे, विकास कलघटगी, मल्लेश चौगुले, मध्यवर्ती नवरात्र- दसरा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, अभिजीत चव्हाण, राहुल कुरणे, लक्ष्मण किल्लेकर, जोतिबा धामणकर, नामदेव नाईक, नागेंद्र नाईक, श्रीनाथ पवार, हनुमंत पाटील, राहुल कुरणे, बद्रु पुजारी, प्रथमेश अष्टेकर, नाना अष्टेकर, राहुल जाधव, अभी किल्लेकर आधी उपस्थित होते.